आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे जिल्ह्यात निवडणूक प्रचार साहित्यावर निर्बंध

    पुणे जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रचार साहित्यावर विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    ७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या काळात शांतता, निर्भय व न्याय्य वातावरण राखण्यासाठी निवडणूक प्रचार साहित्यावर विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक इमारतींवर आणि रस्त्यांवर विनापरवानगी पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट्स लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या जातीय किंवा धार्मिक भावना भडकवणाऱ्या प्रचार साहित्यावर पूर्णपणे बंदी असेल.

    या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम २२३ नुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.