आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

    पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०१६-१७ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

    ७ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०१६-१७ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. ही योजना पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे.

    या योजनेत द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, केळी, मोसंबी, पपई, नारळ पिकासाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा, अंजीर पिकासाठी ३० नोव्हेंबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर आणि डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०१७ ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

    योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ७-१२ उतारा, बँक खाते तपशील, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.