शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा; शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करणार! : बाळासाहेब गोतारे
शिक्षक फाउंडेशनच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करणारे बाळासाहेब गोतारे यांनी शिक्षकांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

पिंपरी : शिक्षक फाउंडेशनच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करणारे बाळासाहेब गोतारे यांनी शिक्षकांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले. "शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असावा, तरच तो शिक्षकांच्या अडचणी समजू शकतो," असे त्यांनी म्हटले आहे.
गोतारे यांनी सांगितले की, माझी उमेदवारी केवळ आमदार होण्यासाठी नाही, तर शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आहे. जुनी पेन्शन योजना, अनुदान, वेतन व सेवा-सवलती, पदोन्नती यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवर ते सातत्याने पाठपुरावा करणार आहेत.
ग्रामीण भागातील शाळा सक्षम करणे आणि शिक्षकांना सन्मानाची वागणूक मिळवून देणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधान परिषदेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी ते संवाद साधत आहेत.
