आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    चाकण एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न सुटणार! पीएमआरडीए आणि एमआयडीसीचा मोठा प्लॅन; ९ एकर जागेचा प्रस्ताव

    चाकण एमआयडीसी परिसरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पीएमआरडीए आणि एमआयडीसीने ९ एकर जागेवर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा मोठा प्लॅन तयार केला आहे.

    ७ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : चाकण एमआयडीसी परिसरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पीएमआरडीए आणि एमआयडीसीने ९ एकर जागेवर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा मोठा प्लॅन तयार केला आहे. या प्रकल्पासाठी जागेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुंबईतील संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

    चाकण एमआयडीसी परिसरात नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याच्या उद्योजकांच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेऊन कचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. प्रकल्प प्राथमिक अवस्थेत असला तरी त्याला गती देण्याची गरज आहे.

    या प्रकल्पामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे होणार असून, परिसराचे विद्रुपीकरण थांबण्यास मदत होईल. उद्योजकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.