आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    थेरगाव येथे पैशांच्या वादातून खून, एकास अटक

    थेरगाव येथील मधुबन कॉलनी येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एका व्यक्तीचा चाकूने वार करून खून करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    ७ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : थेरगाव येथील मधुबन कॉलनी येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एका व्यक्तीचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी यल्लालिंग उर्फ यल्लाप्पा शिवशरणप्पा आळंदकर याला अटक केली आहे.

    मयत व्यक्तीच्या पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पैशांच्या वादातून आरोपीने फिर्यादीच्या पतीवर धारदार चाकूने सलग चार ते पाच वेळा वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.