आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    हिवाळी अधिवेशनात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यात सुधारणा विधेयक आणणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

    गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात 'पीसीपीएनडीटी' कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आणणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

    ७ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यासाठी आणि कायद्यातील पळवाटा रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात 'पीसीपीएनडीटी' (PCPNDT) कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आणणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित राज्यस्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.

    बैठकीत गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४ व २००३ च्या कठोर अंमलबजावणीसाठी चर्चा करण्यात आली. बोगस डॉक्टरांवर मोक्का लावणे, गुन्हे सिद्धता आणि शिक्षा यात बदल करणे आवश्यक असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले. बोगस डॉक्टरांची यादी तयार करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.

    तसेच, बाजारात सोनोग्राफी करण्यासाठी पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत, अशा मशीनच्या वापरावर बंदी घालण्यात यावी आणि सोनोग्राफी मशीनच्या वापराची खातरजमा करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीला आमदार नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे उपस्थित होत्या.