आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    अभिनयातील 'नटसम्राट' हरपला

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    ८ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे कलाविश्व आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, नानांची आकस्मिक एक्झिट अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी केलेले सामाजिक कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर एक संवेदनशील सामाजिक जाणीव असणारे व्यक्तिमत्त्व होते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.