आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली देशात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

    नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०१६ या तिमाहीच्या डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

    ८ ऑक्टोबर २०२६

    गडचिरोली : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०१६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कृषी व जलसंपदा या क्षेत्रांतही जिल्ह्याने देशात प्रथम स्थान पटकावले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचे आणि सर्व घटकांचे कौतुक केले आहे. तसेच सहपालकमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांनीही जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

    आकांक्षित जिल्हे कार्यक्रमातील आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेशन व कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या पाच प्रमुख क्षेत्रांतील एकूण ४८ निर्देशकांमध्ये निर्धारित कालावधीत झालेल्या सुधारणांच्या आधारे डेल्टा रँकिंग निश्चित केले जाते. गडचिरोली जिल्ह्याने विविध विभागांनी समन्वयाने केलेल्या प्रयत्नांमुळे विकासाच्या निर्देशकांमध्ये सुधारणा साधली आहे.