पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. हनमंतू तुम्मोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. हनमंतू तुम्मोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधण्यासाठी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, बंडगार्डन पुणे येथे सकाळी १० ते दुपारी ११ या वेळेत भेटता येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी दिली.
नागरिक आणि उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास ते निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधू शकतात. यासाठी संपर्क क्रमांक ९२८४०७८४११ असा जाहीर करण्यात आला आहे.
