आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    कोटक सिक्युरिटीजने आपल्या रिटेल व्यवसायाचे नाव बदलून केले “कोटक निओ” गुंतवणूक, ट्रेडिंग आणि वेल्थ सोल्यूशन्स आपले एकाच छताखाली

    कोटक सिक्युरिटीज लिमिटेडने आपल्या रिटेल ग्राहकांसाठीच्या ब्रँडचे नाव बदलून "कोटक निओ" केल्याची घोषणा केली आहे.

    ८ ऑक्टोबर २०२६

    पुणे : कोटक सिक्युरिटीज लिमिटेडने आपल्या रिटेल ग्राहकांसाठीच्या ब्रँडचे नाव बदलून "कोटक निओ" (Kotak Neo) केल्याची घोषणा केली आहे. याद्वारे एकाच छताखाली गुंतवणूक, ट्रेडिंग आणि वेल्थ सोल्यूशन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ग्राहकांना डिजिटल-फर्स्ट प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ आणि तंत्रज्ञान-आधारित गुंतवणूक अनुभव देणे हा यामागचा उद्देश आहे.

    कोटक सिक्युरिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाल शाह यांनी सांगितले की, बदलत्या काळातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. याद्वारे ग्राहकांना शेअर्स, म्युच्युअल फंड, फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांसारख्या विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे सोपे होणार आहे.