आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

    बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

    ८ ऑक्टोबर २०२६

    बारामती : बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात महाविद्यालयातील प्राध्यापक, वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थी, तसेच इतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

    या अभियानांतर्गत रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली आणि कचऱ्याचे योग्य संकलन व वर्गीकरण करण्यात आले. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्वांनी नियमित प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.