स्मिथ अँड जोन्सने अभिनेत्री रसिका दुगलसोबत सुरु केले नये कॅम्पेन; आले-लसूण पेस्टबाबत ग्राहक जागृती करण्यासाठी उचलले महत्त्वाकांक्षी पाऊल
स्मिथ अँड जोन्स या ब्रँडने अभिनेत्री रसिका दुगलसोबत 'आले-लसूण पेस्ट'च्या वापराबाबत ग्राहक जागृती करण्यासाठी नवीन मोहीम सुरू केली आहे.

पुणे : टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा प्रमुख फूड ब्रँड 'स्मिथ अँड जोन्स'ने अभिनेत्री रसिका दुगलसोबत नवीन कॅम्पेन सुरू केले आहे. या मोहिमेचा उद्देश ग्राहकांना आले-लसूण पेस्टच्या वापराबाबत जागरूक करणे आणि स्वयंपाकात त्याचा वापर कसा सोपा व चवदार ठरतो, हे पटवून देणे आहे.
या मोहिमेअंतर्गत 'आले-लसूण पेस्ट'च्या शुद्धतेची आणि चवीची खात्री कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. स्मिथ अँड जोन्सची आले-लसूण पेस्ट घरगुती चव देते आणि स्वयंपाकाचा वेळ वाचवते, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
