एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रम ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान पुण्यात
भारताच्या विविध राज्यांमधील कला, हस्तकला आणि जीवनशैलीचे दर्शन घडवणारा 'एक भारत, श्रेष्ठ भारत' उपक्रम ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
पुणे : भारताच्या विविध राज्यांमधील कला, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि जीवनशैलीचे दर्शन घडवणारा 'एक भारत, श्रेष्ठ भारत - फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६' हा उपक्रम ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पुना क्लब लिमिटेड, बंड गार्डन रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या एक्स्पोमध्ये विविध राज्यांतील पारंपरिक हस्तकला, लघु व मध्यम उद्योगांची उत्पादने, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हा उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, नागरिकांनी याला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
