पिंपरी चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निदेशक पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) तासिका तत्त्वावर निदेशक पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
पुणे : पिंपरी चिंचवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) विविध विभागांमध्ये तासिका तत्त्वावर निदेशक (Instructor) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी संबंधित क्षेत्रातील पदविका किंवा पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य ए. के. जाधव यांनी केले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबरपर्यंत आहे.
