लघुलेखन अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाकडून लघुलेखन (Shorthand) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाकडून मराठी लघुलेखन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य अ. स. साबळे यांनी केले आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि इतर प्रक्रिया औंध येथील प्रशिक्षण संस्थेत पूर्ण केली जाईल. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
