४१५ मॉडिफाइड सायलेन्सर आणि ५९१ फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत ४१५ मॉडिफाइड सायलेन्सर आणि ५९१ फॅन्सी नंबर प्लेट्स रोड रोलर फिरवून नष्ट केल्या आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई केली आहे. गेल्या महिनाभरात जप्त केलेले ४१५ मॉडिफाइड सायलेन्सर आणि ५९१ अनधिकृत फॅन्सी नंबर प्लेट्स रोड रोलरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या.
वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त (वाहतूक) निलेश देशमुख यांनी सांगितले की, सायलेन्सर बदलून आवाज करणाऱ्या वाहनांमुळे नागरिक, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
