चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध
पिंपरी-चिंचवड शहराला चासकमान धरणातून पाणी देण्याच्या योजनेला खेड तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी चासकमान धरणातून पाणी आणण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र, या योजनेला खेड तालुक्यातील स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. धरणातून पाणी दिल्यास स्थानिक शेतीला पाणी कमी पडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ही योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर पाण्याचे नवे स्त्रोत शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.
