आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    भाजपाच्या 'सेवा ज्योती यात्रे'तून विकसित भारताचा संकल्प

    पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आयोजित 'सेवा ज्योती यात्रा' भोसरी येथे उत्साहात पार पडली, ज्यामध्ये विकसित भारताचा संकल्प करण्यात आला.

    ८ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित 'विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा' भोसरी येथे उत्साहात पार पडली. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रविकास, जनसेवा आणि संघटन बळ अधिक मजबूत करण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

    या कार्यक्रमाला आमदार शंकर जगताप, उमाताई खापरे, महापौर रवी लांडगे आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' संकल्पनेला जनसहभागाची जोड देणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी सांगितले.