आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सेवा संकल्प अभियानातून 'रक्तदानाचा संकल्प', पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळ

    पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत १७ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

    ८ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत १७ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश रक्ताची गरज पूर्ण करणे आणि जीवनदानाची चळवळ उभी करणे हा आहे.

    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले की, अपघातातील रुग्ण, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण आणि इतर गरजू रुग्णांसाठी रक्ताची मोठी आवश्यकता असते. नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.