मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी पुणे येथे विशेष न्यायालयाची स्थापना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी पुणे येथे विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि अशा प्रकरणांचा निकाल वेळेत लागावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून पुणे येथे विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. ६ ऑगस्ट २०२६ रोजी नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत या न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
या विशेष न्यायालयामुळे अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणांचा वेगाने निपटारा होण्यास मदत होणार आहे. तसेच तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे न्यायालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
