शैक्षणिक इतिहासातील सुवर्णक्षण; केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचे लोकार्पण
रत्नागिरी येथील केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि लोकमान्य टिळक नगरपरिषद शाळा क्र. २ च्या पुनर्बांधणीचे लोकार्पण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

रत्नागिरी : रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. रत्नागिरी येथील केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि लोकमान्य टिळक नगरपरिषद शाळा क्र. २ च्या पुनर्बांधणीचे लोकार्पण उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरीत केंद्रीय विद्यालय सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
