काश्मिरी तरुणांवर हल्ला केल्याप्रकरणी FIR दाखल ; इंडिया ब्लॉक मार्चमध्ये हिंसाचार
दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात इंडिया ब्लॉक मार्चदरम्यान एका काश्मिरी तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात काल झालेल्या इंडिया ब्लॉक मार्चदरम्यान एका काश्मिरी तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
मारहाण झालेल्या पीडित तरुणाचे नाव फहीम नझीर असून तो श्रीनगरचा रहिवासी आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी या घटनेचे फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या घटनेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राहुल गांधींच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा हिंसाचार झाल्याचे बोलले जात आहे.
