आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षकांकडून पूर्वतयारीचा आढावा

    पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा निवडणूक निरीक्षकांनी घेतला.

    ९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक ओम प्रकाश बकोरिया आणि डॉ. हनमंतू तुम्मोड यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला.

    विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत मतदार यादीतील नावांच्या तक्रारींचे निवारण करणे, मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरवणे, आचारसंहितेचे पालन करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे यावर चर्चा करण्यात आली.

    निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि मतदारांना मतदानाची माहिती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.