आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    महाखनिज २.० पोर्टलशी विविध विभागांच्या प्रणालींचे तातडीने संलग्नीकरण करा : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विभागांच्या संगणकीय प्रणाली महाखनिज २.० पोर्टलशी तातडीने जोडण्याचे निर्देश दिले आहेत.

    ९ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : विविध विभागांचे कामकाज, परवानग्या आणि संगणकीय प्रणाली महाखनिज २.० पोर्टलशी तातडीने संलग्न कराव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

    नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये वापरण्यात येणारी डीसीआर प्रणाली महाखनिज २.० पोर्टलशी जोडण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच पर्यावरण, वन आणि नगरविकास विभागांकडून मिळणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्रांची प्रक्रियाही महाखनिजशी जोडण्यावर भर दिला.

    यामुळे खणपट्टा मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांचा डेटाबेस तयार होऊन तो महाखनिज पोर्टलशी जोडला जाईल आणि नियमित अद्ययावत ठेवला जाईल, ज्यामुळे नागरिकांना सुलभता येईल.