दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरु
पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.
पुणे : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व इतर नैसर्गिक घटकांमुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांचा यात समावेश आहे.
या आठ तालुक्यांमधील एकूण १,१०२ गावातील ८ लाख २८ हजार ४२८ खातेदार पंचनाम्याच्या कार्यवाहीत समाविष्ट झाले आहेत. एकूण ३ लाख ३२ हजार ५८ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणीही नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही.
