आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई

    पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील रस्त्यांच्या झाडणकामाच्या निविदेत झालेल्या गोंधळाची चौकशी सुरू केली आहे.

    ९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहराच्या स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या प्रायोगिक तत्त्वावरील परफॉर्मन्स बेस्ड झाडूकाम उपक्रमाच्या नियोजनात मोठी अनागोंदी समोर आली आहे. शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष लांबी २३९६ कि.मी. असताना मॉपिंगमध्ये तब्बल साडेआठ हजार कि.मी. रस्ते दाखवण्यात आले आहेत.

    यामुळे आधी केलेल्या मॉपिंगची पुन्हा पडताळणी करून खाजगी आणि दुबार मोजणी झालेले रस्ते वगळण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. या गोंधळामुळे नेमका किती खर्च आणि मनुष्यबळ लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनेक कायमस्वरूपी सफाई सेवक वर्षानुवर्षे गैरहजर असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.