आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    नवरात्रोत्सवात देवीच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

    पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) नवरात्रोत्सवात भाविकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे.

    ९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : नवरात्र उत्सवात पुणे शहर आणि जिल्ह्यातील देवींच्या विविध शक्तीस्थळांच्या दर्शनासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) दोन विशेष मार्ग नियोजित केले आहेत. या मार्गांवर वातानुकूलित ई-बसेसद्वारे सेवा दिली जाणार आहे.

    पर्यटन बससेवा क्र. १३ (१) ही पुणे स्टेशन, स्वारगेट मार्गे तळजाई माता मंदिर, पद्मावती मंदिर, मुक्ताई माता मंदिर, श्रीनाथ म्हस्कोबा आणि इतर मंदिरांचे दर्शन घडवून पुन्हा स्वारगेटला येईल. या सेवेसाठी प्रति व्यक्ती ५०० रुपये तिकीट दर आहे.

    भाविकांच्या वाढत्या मागणीनुसार शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ही सेवा उपलब्ध असेल. भाविकांनी आगाऊ तिकीट बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.