पिंपरी चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निदेशक पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पिंपरी : पिंपरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर शिल्प निदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन प्राचार्य ए.के. जाधव यांनी केले आहे.
