दसरा-दिवाळीसाठी केरळ पर्यटनाची व्यापक मोहीम सुरू
केरळ पर्यटनाने दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे.

पुणे : दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केरळ पर्यटनाने व्यापक प्री-सीझन मोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये भागीदारी बैठका आणि रोड शो आयोजित केले जात आहेत.
या मोहिमेअंतर्गत केरळमधील समुद्रकिनारे, बॅकवॉटर, पर्वतीय पर्यटनस्थळे आणि सांस्कृतिक वारसा यांचे सादरीकरण केले जात आहे. पर्यटकांसाठी विशेष पॅकेजेसही जाहीर करण्यात आले आहेत.
केरळ हे पर्यटनासाठी सुरक्षित आणि निसर्गरम्य ठिकाण असून पर्यटकांनी या सुट्ट्यांमध्ये केरळला भेट द्यावी, असे आवाहन केरळ पर्यटनाच्या वतीने करण्यात आले आहे.
