या दिवाळीत, कॅलिफोर्निया बदामची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या प्रत्येक 'बडी'ला बदाम भेट द्या
कॅलिफोर्निया बदामने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'प्रत्येक बडीसाठी बदाम' ही नवीन मोहीम सुरू केली आहे.

पुणे : कॅलिफोर्निया बदामने दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून 'प्रत्येक बडीसाठी बदाम' ही नवीन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे ग्राहकांना त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना बदाम भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळीत मिठाईऐवजी आरोग्यदायी बदाम भेट देणे हा एक चांगला पर्याय असून, यामुळे नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल, असे कॅलिफोर्निया बदामच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या मोहिमेसाठी एक विशेष संगीतमय व्हिडिओही तयार करण्यात आला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
