आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण

    आळंदी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

    ९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आळंदी येथील सिद्धबेट परिसरात मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम वोडाफोन इंटेलिजंट सोल्यूशन्सच्या सीएसआर निधीतून राबविण्यात आला.

    या उपक्रमात इंडिव्ह कन्सल्टन्सीने भागीदार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. मियावाकी पद्धतीमुळे झाडांची वाढ वेगाने होते आणि कमी जागेत दाट जंगल तयार होते, ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

    सिद्धबेट परिसरात विकसित होणारे हे मियावाकी वन भविष्यात शहरासाठी हरित फुफ्फुस ठरेल, असा विश्वास आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी व्यक्त केला.