आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    तागापासून तयार केलेल्या वस्तूच्या वापराने पर्यावरण संवर्धन शक्य-राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशी भूषण सिंह यांचे मत

    तागापासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर केल्यास पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्य असल्याचे मत राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव शशी भूषण सिंह यांनी व्यक्त केले.

    ९ ऑक्टोबर २०२६

    पुणे : सिंथेटिक आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून, तागापासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर वाढवणे हा यावर उत्तम पर्याय आहे, असे मत राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव शशी भूषण सिंह यांनी व्यक्त केले.

    पुण्यात आयोजित राष्ट्रीय ताग प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनात देशभरातील कारागिरांनी तयार केलेल्या तागाच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

    तागाच्या वापरामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होते आणि हे पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे, त्यामुळे नागरिकांनी तागाच्या वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.