खड्ड्यांत शहर, मग सायकल स्पर्धेसाठी चिखलीत महापालिकेची मोठी कारवाई; पाच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चिखली परिसरात कारवाई करून पाच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच अनधिकृत आरसीसी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. सुमारे १२,००० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत.
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनधिकृत बांधकामांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
