आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्या, रखडलेल्या कामांना गती द्या..

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.

    ९ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने अधिक गतिमान पद्धतीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिले.

    महापालिकेच्या सर्व अभियंत्यांची बैठक घेऊन बारणे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित कामांचा आढावा घेतला. पावसाळ्यात निर्माण झालेल्या रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेजच्या समस्या आणि पाणीपुरवठा यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.

    प्रलंबित कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी बजावले.