खड्ड्यांत शहर, मग सायकल स्पर्धेसाठी कोट्यवधींची उधळपट्टी कशासाठी ?
पिंपरी चिंचवडमधील रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना सायकल स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना, महापालिकेच्या वतीने आयोजित सायकल स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध नसताना अशा क्रीडा स्पर्धांवर एवढा मोठा खर्च करणे चुकीचे आहे. करदात्या नागरिकांच्या पैशांचा हा अपव्यय असून, आधी रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या सायकल स्पर्धेला विरोध दर्शवत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, हा खर्च थांबवून तो निधी जनहिताच्या कामांसाठी वापरण्याची मागणी केली आहे.
