आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    सक्षम सागरी परिसंस्थेसाठी एकात्मिक विकास महत्त्वाचा - मंत्री नितेश राणे

    सागरी परिसंस्थेच्या विकासासाठी एकात्मिक विकास मॉडेल महत्त्वाचे असल्याचे मत बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

    ९ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या सागरी परिसंस्थेच्या विकासासाठी आणि बंदरांच्या कनेक्टिव्हिटीसाठी एकात्मिक विकास मॉडेल अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

    आंध्र प्रदेशचे बंदर मंत्री बी. सी. जनार्दन रेड्डी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी यावर सविस्तर चर्चा केली. दोन्ही राज्यांच्या बंदर विकासातील उत्तम पद्धतींचा अभ्यास करून नवीन उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल.

    यामुळे सागरी पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक मच्छिमारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.