आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनेलने खातं उघडलं

    बारामती येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने संग्राम सोरटे यांच्या विजयाने खाते उघडले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १२ ऑक्टोबर २०२६

    बारामती : बारामती येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी माळेगाव येथे सुरु झाली असून, सुनेत्रा पवार यांच्या 'सोमेश्वर सहकार पॅनेल'ने ब वर्ग गटातून विजय मिळवत खाते उघडले आहे. या गटातून संग्राम सोरटे १३१ पैकी ९१ मते मिळवून विजयी झाले.

    कारखान्याच्या २१ जागांसाठी तिरंगी लढत झाली असून संपूर्ण २१-० असा विजय मिळवण्याचा दावा दोन्ही बाजूंकडून व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार पार्थ पवार यांनी सर्व २१ जागांवर विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.