आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    मनोरंजन

    मराठी अभिनेत्री मधु कांबळीकर यांचं निधन

    ज्येष्ठ मराठी चित्रपट, नाट्य व लावणी कलावंत मधु कांबळीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १२ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबळीकर यांचे ७३ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बीड जिल्ह्यातील माळेगाव येथून त्यांनी तमाशाच्या फडातून कारकिर्दीला सुरुवात केली होती.

    त्यांनी व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, दूरदर्शन मालिका आणि अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'शापित', 'हेच माझं माहेर', 'एक होता विदूषक', 'झपाटलेला' यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.