आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली

    पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार स्वतःहून रजेवर गेले आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलने सुरू होती. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली होती. यानंतर १२ दिवस चाललेल्या आंदोलनानंतर आयोगाच्या कारभाराविषयी चौकशी समिती नेमण्यात आली.

    माजी न्यायमूर्ती दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी पूर्ण करेपर्यंत अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सकारात्मक वळण मिळाले आहे.