आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    नवरात्रीत ४ मंदिरांजवळ वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद

    नवरात्रोत्सवाच्या काळात तांबडी जोगेश्वरी, चतुःशृंगी, भवानी माता आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात पुणे पोलिसांनी वाहतुकीत बदल केले असून काही रस्ते बंद ठेवले आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक शाखेने बदल जाहीर केले आहेत. तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरातील अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक रस्ता एकेरी करण्यात आला आहे.

    चतुःशृंगी मंदिर, भवानी माता मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात आवश्यकतेनुसार रस्ते बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. भाविकांनी वाहने पार्किंगच्या नियुक्त ठिकाणीच लावावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.