आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    १६ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत दीड हजार डेंग्यूचे रुग्ण

    पुणे महापालिकेच्या १६ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत जून ते सप्टेंबर दरम्यान १,६४३ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे शहरात बदलत्या हवामानामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोथरूड-बावधन, नगररस्ता-वडगावशेरी आणि औंध-बाणेर परिसरात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.

    कोथरूडमध्ये २२९, नगररस्त्यावर २२२ तर औंध-बाणेर भागात २१२ रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी साचलेले पाणी नष्ट करावे आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.