महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ ; मतदान प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण वर्गात तुषार ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.

पुणे : पुणे विभागातील विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. निष्पक्ष व पारदर्शक मतदान होण्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.
प्रशिक्षणादरम्यान मतपत्रिकांचा वापर, गोपनियतेचे रक्षण, मतदारांची ओळख पडताळणी आणि ईव्हीएम/मतपेटी हाताळणीबाबत सविस्तर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करण्यात आले.
