आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सर्प, पक्षी व वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

    बारामती तालुक्यातील सुपे येथील न्यू English स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण आणि सर्प-पक्षी संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १२ ऑक्टोबर २०२६

    बारामती : वनविभाग आणि रेस्क्यू टीम बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने सुपे येथील न्यू English स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहाचा सांगता समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांना साप, पक्षी व इतर वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी माहिती देण्यात आली.

    निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. मानवी वस्त्यांमध्ये वन्यजीव आढळल्यास रेस्क्यू टीमला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.