नानगाव येथे खरीप हंगाम दुष्काळ पंचनामा बाबत जनजागृती
दौंड तालुक्यातील नानगाव येथे खरीप हंगाम दुष्काळ पंचनामा अर्ज करणे, पीएम किसान व महिला शेतकरी प्रमाणपत्राबाबत शेतकर्यांसाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पुणे : दौंड तालुक्यातील १०४ गावांमध्ये खरीप हंगामातील पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नानगाव ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना पंचनामा अर्ज भरण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
ग्राम महसूल अधिकारी नीलिमा बोकडे, सरपंच व कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करण्याचे आवाहन केले.
