संधिवाच ही केवळ वृद्धापकाळातील समस्या नाही; वेळीच निदान महत्त्वाचे
जागतिक संधिवात दिनानिमित्त नोबेल हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विशाल चौधरी यांनी तरुण वयातही संधिवात होऊ शकतो, त्यामुळे वेळीच निदान आवश्यक असल्याचे सांगितले.

पुणे : संधिवात हा केवळ वृद्धापकाळात होणारा आजार आहे हा समज चुकीचा आहे. आजकाल तरुणांमध्येही संधिवाताची लक्षणे दिसून येत आहेत. सकाळी उठल्यावर सांधे अकडणे आणि सूज येणे ही सुरुवातीची लक्षणे असतात.
नोबेल हॉस्पिटलचे डॉ. विशाल चौधरी यांनी नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. दुर्लक्ष केल्यास सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
