पुण्यात एक नोव्हेंबर रोजी एकता दौड; ४० हजार नागरिक होणार सहभागी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त १ नोव्हेंबर रोजी पुण्यात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत.
पुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात १ नोव्हेंबर रोजी 'पुणे रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी, ५ किमी आणि कौटुंबिक फन रन अशा विविध गटांचा समावेश आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विजेत्यांना १० लाख रुपयांहून अधिक बक्षीसे दिली जाणार आहेत.
