घोडेगाव येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात 'खुले ग्रंथालय व पुस्तक परिचय' उपक्रम
सेवा संकल्प अभियानांतर्गत घोडेगाव येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात खुले ग्रंथालय व पुस्तक परिचय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पुणे : सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत घोडेगाव येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात १० ऑक्टोबर रोजी खुले ग्रंथालय व पुस्तक परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या उद्देशाने उपक्रम राबवण्यात आला. मुलींनी आवडीची पुस्तके निवडून वाचन केले व आपले विचार मांडले.
