सेंट्र्ल किचनची प्रतीक्षाच! पुणे विद्यापीठातील जेवणात अळ्या अन् प्लॅस्टिकचे तुकडे; वसतिगृहातील मेसचे कंत्राटही रद्द
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील जेवणात अळ्या व प्लॅस्टिकचे तुकडे आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने मेसचा परवाना निलंबित केला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील जेवणात अळ्या आणि प्लॅस्टिकचे तुकडे आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तपासणी करून अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले.
विद्यापीठ प्रशासनाने संबंधित मेसचे कंत्राट निलंबित केले असून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या रिफेकटरीमध्ये जेवणाची सोय करण्यात आली आहे. मात्र सेंट्रल किचनची योजना अद्याप प्रलंबितच आहे.
