मोशी-चऱ्होली-चिखली परिसरात उभारणार 'नाना पाटेकर नाट्यगृह' ?
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मोशी-चऱ्होली-चिखली परिसरात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने नाट्यगृह व सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या मोशी-चऱ्होली-चिखली या वेगाने विकसित होणाऱ्या भागात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने भव्य नाट्यगृह आणि बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
या भागात वाढती लोकसंख्या लक्षात घेता आधुनिक सुविधांयुक्त नाट्यगृहाची गरज आहे. यामुळे नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
