केएसबी चौकात ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक; ८ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, आई-वडील गंभीर जखमी
पिंपरीतील केएसबी चौकाजवळ ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले.

पिंपरी : पिंपरीतील केएसबी चौकाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याने ८ वर्षीय चिमुकली फराअन मोमीन हिचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात तिचे वडील फराअन मोमीन (वय ३२) व आई फर्जाना मोमीन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर निगडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
